Home Breaking News पळसपुर येथे महिला सन्मान कार्यक्रम संपन्न

पळसपुर येथे महिला सन्मान कार्यक्रम संपन्न

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 13 मार्च 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे प्रतिभावान महिलांच्या कर्तृत्वाला सन्मान; जिओलाईफ ॲग्रोटेक इंडिया लिमिटेड या कंपनीने महिला सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामीण भागातील महिला शेतकरी शेतमजूर शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान केला. कारण एक स्त्री ही पुरुषापेक्षा घराला पुढे नेऊ शकते
एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी
महिलांच्या सर्वांगीण विकासातच समाजाची प्रगती असल्याच्या विचारातून सर्वांनी मार्गक्रमण करायला हवे, या विचारातून सातत्याने कार्यरत असणाऱ्या महिला गावासाठी आणि सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्या महिलांचा सन्मान ह.भ.प. वाशिमकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला आहे.. शारदाबाई पांडुरंग वानखेडे, कमलबाई नागोराव वानखेडे, पुष्पाबाई गाडगेवाड,चंद्रकला बोबिंलवार, शांताबाई गायकवाड, कमलबाई वाडेकर, अन्नपूर्णाबाई बेंद्रे
या महिलांचा सन्मान पळसपुर येथील नागनाथ मंदिर येथे हरिनाम सप्ताहात देण्यात आला आहे. जिओलाईफ ॲग्रोटेक इंडिया या कंपनीने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज काल जमिनीचे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. मानवी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर चर्चा व मार्गदर्शन केले जिओलाईफ ॲग्रोटेक इंडिया या कंपनीचे प्रोडक्ट वापरण्याची काय गरज आहे. हि भारतातील नॅनो टेक्नॉलॉजी आधारित कंपनी आहे. तसेच बॅक्टेरिया वर आधारित तसेच अर्काचा आधारित उत्पादने देवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणारी ही कंपनी आहे. या कंपनीने सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. जो कि समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे…
या कार्यक्रमांची संकल्पना ईश्वर गायकवाड सर, गजानन वावरे सर, तसेच अंकीता मॅडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रम साठी दिंगाबर पाटील वानखेडे व पळसपुर कोंबडाराव कदम, आत्माराम देवसरकर, साईनाथ जाधव ,तुकाराम वानखेडे अविनाश वानखेडे तसेच नागनाथ मंदिर कमेटी यांचे विशेष योगदान लाभले असे कार्यक्रम दरवर्षी ठेवून गावातील महिलांचा सन्मान वाढवावा अशी गावातील नागरिकांनी ईच्छा व्यक्त केली.

Previous articleतालुका कृषि अधिकारी व्हि. आर. चन्ना यांची कृषि उपसंचालक पदी पदोन्नती!
Next articleहेमंत शिंदे यांचा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने सत्कार