👉 उपविभागीय कृषि अधिकारी रणवीर सर यांचे प्रतिपादन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-10 मार्च 2024
आपल्या जिवणात आपण दुस-याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी सांगता सांगता आपण सतत सांगत किंवा इतरांना सल्ले देत राहतो. परंतु माझ्यामते आपण आपल्या जिवणात एखादी चांगली कृती करुन दाखविली तर ती शंभर भाषणाला भारी ठरते. असे उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणवीरसर यांनी पवित्र पावण महाशिवरात्री निमित्त आपल्या परस बागेतील विविध फळ,फुले यांची व्हिडीओ सादर करत म्हटले आहे. त्यांनी आमच्या परसबागेत विविध सेंद्रिय पध्दतीने केळी, पपई, चिकु, नारळ, आंबा, शेवगा या फळांची लागवड केली आहे. नुसती लागवड केली नसुन प्रत्यक्षात त्यांनी फळे सुध्दा घेतली आहेत. एका केळीच्या झाडांना 50 किलोचा केळीचा घड पिकविला आहे. त्याचबरोबर विविध फुलझाडांची लागवड केली आहे. त्यात जाई, जुई, गुलाब, जास्वंद, झेंडु आदी फुलझाडांची लागवड केली. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला प्रत्येकांने एक आठवण म्हणून जरी फळझाड लावले तर ते आपण आपल्या घरी सर्वांना खायायला मिळेल. असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी अतिशय कमी खर्चात सेंद्रिय पध्दतीने हि आपल्याच घरासमोरील हि बाग फुलवली आहे. सध्या उन्हाळ्यात तापमानात वाढ झाली आहे. वातावरणातचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकांने हे केरावे. नाही तर जिवाचे काही खरे नाही. !!!
डोकयाला हात लावून बसण्यापेक्षा आजच एक तरी झाड मुलाकडून लावुन घ्या .आणि त्याला मोबाईल पासून दूर ठेवा अशी ही विनंतीही त्यांनी केली आहे…!!