मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 08 मार्च 2024
महाशिवरात्री निमित्त हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी रात्री बारा वाजेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. यावर्षी सात लाख रुपयांची बक्षिसांची लयलूट होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन, प्रवचन, शिवलिला अमृत ग्रथांचे वाचन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य शंकरपट स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, हाॅलीबाॅल स्पर्धा, कब्बडी स्पर्धा, भजन स्पर्धा, पशुचे प्रदर्शन आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीने गेल्यावर्षी मंदिरातील शुशोभिकरण करुन, यावर्षी डीजीटल टिव्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवुन भाविकांना श्रींचे लाईव्ह दर्शन घेता यासाठी व्यवस्था करण्यात आली. खेळाडू, व्यापारी, बैलजोडी धारकांनी, व भाविकांना या यात्रेचा लाभ घ्यावा असे यात्रा कमेटीने कळविले आहे.
श्रींचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना फराळ केळी, दुधाचे वाटप करण्यात आले.
👉 आमदार माधवराव पाटील यांनी घेतले श्री चे दर्शन
हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगांवर यांनी मंदिरात रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला आहे.