Home Breaking News जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार …

जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार …

..डॉ.कोण येणार व कधी येणार कर्मचाऱ्यांना ही माहीती नाही.

संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी ….
जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार नागरिकांचे होत आहे हाल डाक्टर हजर नाही…. कर्मचार्यांना सुध्दा माहीती नाही आज कोणत्या डाक्टर ची डीवटी आहे डाक्टर नसल्या मुळे कर्मचारी च देत होते अंदाजी औषध…. प्राथमिक आरोग्य केंद्र जलंब हे नेहमी चर्चेचा विषय झाले आहे काही दिवसा पुर्वी आरोग्य केंद्र जलंब येथील अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे आरोग्य सेवा देण्यात येणारा गलथानपणा या विरोधात गावातील सर्वपक्षीय मंडळी आणि गावकरी यांनी एकत्रित येऊन धरणे आंदोलनाच्य माध्यमातून लढा उभारला.होता या लढ्याला यश ही प्राप्त झाले होते. दिनांक 29 ऑगस्ट 23 ला अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार ए डी एच ओ श्री पवार आणि तालुका आरोग्य अधिकारी श्री खंडारे यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2023 ला प्राथमिक आरोग्य केंद्र जलंब येथे भेट देऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडा झळती घेऊन संपूर्ण अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर केला.होता त्यानंतर आज दिनांक 1सप्टेंबर 2023 ला सदर धरणे आंदोलनाच्या मंडपात येऊन सरपंच दुर्गाताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे प.स.सदस्य विठ्ठल सोनटक्के संजय गव्हांदे दिलीप शेजोळे यांना लेखी आश्वासन दिले होते सदर ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशा कर्मचाऱ्यांवर लवकर कारवाई करू असे आश्वासन देऊन आंदोलनाला स्थगित करण्यात आली होती त्या नंतर काही दिवस रुग्नांना सेवा चांगली देण्यात आली व डाक्टर सह कर्मचारी सुध्दा हजर राहत होते परंतु परत तोच प्रकार परत चालु झाला आहे कधी कर्मचारी तर कधी डाक्टर कधीही येतात व कधीही घरी जातात आज सकाळी डाक्टर हजर नसल्यामुळे बरेच पेशंट ला वापस जावे लागले परंतु मागील दिवस पुढे का आले याला जबाबदार कोन कुणाच्या आशिर्वादाने परत आरोग्य केंद्रा चा कारोभार बिघडला हा प्रश्न आता गावकर्यानापडला आहे तरी त्वरीत यांच्या वर कारवाही व्हावी अशी अपेक्शा गावकर्याची आहे

Previous articleनाशिक महानगरपालिकेच्या खाबूगिरीला हेमंत शिंदे यांनी लावला चाप
Next articleआज 08 मार्च ला धावणारी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द