Home Breaking News दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

पातूर ते बाळापूर रस्त्यावरील वाडेगावनजिकची घटना

वाडेगाव (जि.अकोला) : बाळापूर पातूर रस्त्यावर वाडेगाव नजीक टी पॉईंटजवळ सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की तीनजण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये अब्दुल सादिक अब्दुल रज्जाक (वय ४३), अब्दुल मजीद अब्दुल सादिक (२९), अब्दुल शोएब अब्दुल खालिद (१४) यांचा समावेश आहे.

बाळापूरकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती ट्रीपल सीट जात

होते. दोन्ही दुचाकीचा अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. नेमके तेव्हाच दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या विचित्र अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीतील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविले. तिघे जखमी खिरपुरी येथील रहिवासी असून, ते दिग्रस येथे कार्यक्रमाला जात होते.

अब्दुल सादिक अब्दुल रज्जाक

अब्दुल मजीद अब्दुल सादिक

वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी साधारणतः दोन

किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात कशामुळे झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. अपघात झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

तीन युवक गंभीर जखमी

अब्दुल शोएब अब्दुल खालिद

जखमीमध्ये खिरपुरी येथील सक्षम शिरसाट, प्रणव शिरसाट व पवार नावाचा युवक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. जखमींना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्र व तेथून अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous article🍁✍🏻 *भेट* ‼️
Next articleनाशिक महानगरपालिकेच्या खाबूगिरीला हेमंत शिंदे यांनी लावला चाप