मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक- 29 फेब्रुवारी 2024
सतत वातावरणात बदल होत असल्याने, गहु, हरभरा आणि आंबा फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सद्यस्थितीत गहु आणि हरभरा पिकाची काढणी चालु आहे. तसेच या वर्षी फळांचा राजा आंब्याला चांगला बहार धरला होता. छोटे छोटे आंब्याचे फळे झाडावर दिसत असतांच अचानक वारा, पाऊस आल्याने आंबा फळपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शासनाने आंबा फळपिकांसाठी आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी होत आहे.