Home Breaking News बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन...

बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणी करीता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे न.प.समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे:-खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिल्या जातो त्यामध्ये अनेक वर्षापासून त्रेपन घंटा गाड्या व काही ट्रॅक्टरचा समावेश असतो परंतु मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खामगाव नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना त्रेपन एवजी चाळीस घंटा गाड्यांचा व काही ट्रॅक्टरचा समावेश केला आहे खामगाव शहराची वाढत असलेली लोकसंख्या पाहता त्रेपन घंटा गाड्या सुद्धा घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता कमी पडतात अशा परिस्थितीत खामगाव न.प. मुख्याधिकारी यांनी त्रेपन पेक्षा जास्त घंटागाड्याचा घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना समावेश करायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसे केले तर नाहीच उलट त्रेपन घंटा गाड्यांमधूनही तेरा घंटा गाड्या कमी केल्या आता चाळीस घंटा गाड्यावर खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी आहे पन खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे होत नाही.

खामगावातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदार एस आर ग्रीनवे एम्पायर यांच्याकडे आहे परंतु संबंधित कंत्राटदार स्वतःच्या आर्थिक फायदा करिता चाळीस घंटागाड्याऐवजी फक्त दहा ते बाराच घंटागाड्या चालवत असल्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांना घरातील जमा झालेला कचरा नाईलाजास्तव रस्त्यावर आणून टाकावा लागत आहे म्हणून शहरातील अनेक भागत ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले दिसून येतात यामुळे खामगावकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून त्वरित बंद केलेल्या तेरा घंटागाड्या पुन्हा सुरू कराव्या व स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चाळीस एवजी फक्त दहा ते बाराच घंटा गाड्या संबंधित ठेकेदार चालवत असल्यामुळे तसेच चांदमारी भागातील टेकडीवर संबंधित ठेकेदाराने मनमर्जीप्रमाणे नवीन अवैध डंपिंग ग्राउंड तयार केल्याने व घंटागाडी कामगारांना किमान वेतनुसार पगार देत नाही खामगाव नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित संबंधित ठेकेदाराला कळ्या यादीत टाकून त्यांचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये यासह विविध मागण्याकरीता मनसेच्या वतीने खामगाव नगरपालिकेसमोर आज दिनांक २९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले*

Previous articleहिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
Next articleढगाळ वातावरणामुळे आंबा फळपिकांचे नुकसान..