Home Breaking News पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन अपमानीत केलेल्या वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात...

पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन अपमानीत केलेल्या वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 👉 हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार संघटनेची मागणी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 26 फेब्रुवारी 2024

केंद्र सरकारच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर रेल्वेस्टेशन येथे पत्रकार बांधवांना निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित हिमायतनगर रेल्वेस्टेशन मास्टर यांनी केले होते. प्रत्यक्षात ठरलेल्या कार्यक्रम निमीत्त हिमायतनगर तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधव आपले आपले दैनंदिन कामे आटोपून हिमायतनगर रेल्वेस्टेशन येथे कार्यक्रमात हजर राहून आपली उपस्थिती दर्शविली. पण हिमायतनगर रेल्वेस्टेशन यांनी पत्रकार बांधवांचा घोर अपमान केला. म्हणतात ना…अतिती देवो भव….. याप्रमाणे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. पण हिमायतनगर रेल्वेस्टेशन मास्टर यांना अहंकारी वृत्ती असल्याने पत्रकार बांधवांची घोर निराशा करुन, सर्वांनाच अपमानीत केले आहे.
हे तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी विभागीय व्यवस्थापक डिहीजन नांदेड यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन आपला रोश व्यक्त केला. आणि संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. या मागणीचे निवेदन दिले.

Previous articleदिग्रस बु येथे भव्यदिव्य यात्रा मोहत्सव संपन्न
Next article*वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात बैठक, बेमुदत काम बंद आंदोलन अटळ, वीज कंपनी कडून आज कोणतेही ठोस आश्वासन नाही