7 ते 8लाख भाविकांची मांदियाळी…
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी:-वाडेगाव :- पातुर तालुक्यातील दिग्रस बु येथील पंचक्रोशीतील जागृत दैवत श्री सोपीनाथ संस्थान येथे आठ दिवसीय भव्यदिव्य दिवसाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
या ठिकाणी यात्रेत जिल्हयातील बाळापुर व पातुर तालुक्यातील हजारो नागरीक सह भाविक भक्त मोठ्या हर्षोउल्हासत जमली होती.तसेच आठ दिवसापासून भाविक भक्त राहुट्या ठोकून जमलं होते.तसेच या यात्रेत मुख्य मेजवानी म्हणजे रोडग्याची वांग्याची भाजी प्रसिद्ध असून गावतील प्रत्येक घर घरात रोडग्याची मेजवानी म्हणजे उत्सव होय.जागती ज्योत श्री सोपीनाथांच्या दर्शना करीता गर्दी करतात. तसेच या यात्रेत येणाऱ्या भक्तांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणुन वाडेगाव येथील प्रतिष्ठीत भाजपाचे बाळापुर तालुका अध्यक्ष सुनिल शामराव पाटील मानकर हे अवघ्या १२ वर्षापासुन अविरत ट्रॅक्टर च्या सहाय्याने विनामुल्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. आता तो वारसा त्यांचा मुलगा पुष्पक सुनिल पाटील मानकर हे चालवित आहेत. सुनिल पाटील यांच्या अविरत विनामुल्य सेवेची प्रशंसा करत संस्थानचे अध्यक्ष गुलाबराव पाटील ताले यांनी पुष्पक पाटील मानकर यांचा सत्कार घेऊन त्यांना भेट वस्तु दिली.
यावेळी आकाश पाळणा, ब्रेक डान्सर,मौत का कुआ ,आदी खेळण्याने परिसर भरला होता.तसेच यात्रेचा मुख्य आठवडा म्हणून चांन्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण व पोलीस संरक्षण तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.तसेच या गर्दी मध्ये आरोग्य बिघडू नये म्हणून वाडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी सोहेल खान यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.तसेच सस्ती येथील वैद्यकीय अधिकारी निलेश गाडगे व त्यांचे पथक यांनी रुग्णसेवा देण्यात आली.रुग्णचालक मंगेश जंजाळ जीवन इंगळे,आदी नी सेवा दिली तसेच रुग्णवाहिकेचे डॉ शोएब डॉ मुदतशीर यांची उपस्थिती होती…