Home Breaking News महावितरण व महापारेषण, महानिर्मीती कंपनीच्या वीज कंत्राटी कामगारांचे आज संयुक्त कृती समिती...

महावितरण व महापारेषण, महानिर्मीती कंपनीच्या वीज कंत्राटी कामगारांचे आज संयुक्त कृती समिती च्या वतीने राज्यभरात काम बंद आंदोलन चालू

सदर आंदोनाचा हा ४ चौथा टप्पा असून जर विज कंत्राटी कामगार यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास राज्य भरात विज कंत्राटी कामगार हे २८ फेब्रुवारी पासून ४८ तासाचे काम बंद आंदोलन करणार आहेत आणि ५मार्च पासून बेमुदत काम करण्यात येणार आहे

कार्यालयीन प्रतिनिधी:-अंकुश वानखडे
दिनांक .21 फेब्रुवारी 2024

मागणी :- वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना वेतनात 30% पगारवाढ द्यावी प्रशासकीय खर्चात वार्षिक अब्जावधी रुपये कपात करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा

ऊर्जामंत्री यांनी चर्चेला बोलवावे आज आंदोलनाचं चौथा टप्पा असून 5 मार्च पासून बेमुदत काम बंद करणार असून जनतेची गैरसोय होणार व महाराष्ट्र अंधारात राहील.

मा.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेल्या सूचनांचे पालन प्रशासकीय अधिकारी करत नसल्याने आंदोलनाची वेळ आमच्यावर आली आहे.औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे धरणे आंदोलन करण्यात आले व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सतीश तायडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले आहे व आभार प्रदर्शन नितेश तायडे यांनी केले

Previous articleविश्वशांती बुध्द विहार वाडेगाव येथे शिवजयंती साजरी.
Next articleबाळापुर मधिल शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश.