मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 12 फेब्रुवारी 2024
हिमायतनगर तालुक्यातील मौजे धानोरा येथील लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांचे विश्वासू तथा निकटवर्तीय विजय दिगांबर वळसे पाटील यांची संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे यांनी त्यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी गजानन गोपेवाड पाटील, जेष्ठ शिवसैनिक गुडेटवार आदी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. विजय वळसे पाटील यांची निवड झाल्याबद्दल एका निष्ठावंत कार्यकर्त्यांला कोहळीकर यांनी न्याय दिला आहे. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.