Home Breaking News शेतकऱ्यांच्या थेट बांधावर…… आमदार जवळगावकर….

शेतकऱ्यांच्या थेट बांधावर…… आमदार जवळगावकर….

👉 नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 12 फेब्रुवारी 2024

हिमायतनगर तालुक्यात काल अचानक अवकाळी पाऊस आणि गारा पडल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे कळताच सोमवारी सकाळी सकाळी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. सोबत तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार ताडेवाड साहेब व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. तात्काळ सरसगट आर्थिक मदत मिळावी. अशा सुचनाही त्यांनी महसुल विभागाला दिल्या आहेत. असे वृत आहे. बळीराजा हा जगाचा अन्नदाता आहे. तो सुखी असेल तर जग सुखी राहील. यावर्षी बळीराजावर अनेक संकटे ओडावली आहेत. आपण खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असता, तात्काळ मुंबईला जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावुन दिली. तसेच पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी अठोकाट प्रयत्न केले आहे. पिकविमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. सदैव आपण हदगांव -हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटे आल्यावर सोबतच आहोत. शेतकऱ्यांनी न खचता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी. व आर्थिक उत्पन्नाचा दर्जा वाढवावा. असेही ते म्हणाले.

Previous articleअवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
Next articleपत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा खामगावात निषेध