मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 फेब्रुवारी 2024
संबंध नांदेड जिल्ह्यात आज रोजी अवकाळी पावसामुळे हाहाकार माजविला आहे. हिमायतनगर तालुक्यात अचानक दुपारी विजांचा कडकडाट सुरू होऊन गारांसह अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. याचा फटका गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, तुर, बाजरी आदी पिकांना बसला आहे. शेतक-यावर संकटाची मालीकाच वर्षभर सुरू आहे. या पावसामुळे शेतक-यांच्या प्रचंड नुकसान झाले असुन शेतकरी आता मात्र हतबल झाले आहेत. मोठमोठ्या गारांचा पाऊस पडल्याने हरभरा पिकांच्या घाटयां फुटुन नुकसान झाले आहे. गहू पिक जमिनीवर आडवे पडले आहे. रब्बी ज्वारी फुलोरा अवस्थेत असताना या गारा आणी पाऊस पडल्याने त्या पिकासह तुर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारने त्वरित पंचनामे करून तातडीची सरसगट शेतकऱ्यांना लवकर मदत द्यावी. अशी मागणी जोर धरत आहे.
👉 पिकविम्याची रक्कम मिळावी.
रब्बी हंगामातील पिकांचा पिकविमा भरपुर प्रमाणात शेतकऱ्यांनी भरलेला आहे. पिकविमा कंपनीने सुध्दा त्वरीत शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. अशीही मागणी आहे.