Home Breaking News हातात सगळं आयतं पाहिजे .

हातात सगळं आयतं पाहिजे .

नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे….!!!!

*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे….!!!!

*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे….!!!!

*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच पाहिजे….!!!!

*लाचेशिवाय* काम करणार नाही
*भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे….!!!!

*कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे….!!!!

कामात भले *टाईमपास* करीन
दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे….!!!!

*जातीच्या* नावाने *सवलती* घेईन
देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे….!!!!

मतदान करताना *जात* पाहीन
*जातीयता मात्र बंद* झाली पाहिजे….!!!!

*कर* भरताना पळवाटा शोधीन
*विकास* मात्र जोरात झाला पाहिजे….!!!!

नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे.!!

✍️ जिल्हा संपादक नांदेड

🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳

Previous articleनाशिक महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची हेमंत शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी महासंघ यांनी शिष्टमंडळा सह घेतली भेट
Next articleमुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…