Home Breaking News नाशिक महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची हेमंत शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र...

नाशिक महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची हेमंत शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी महासंघ यांनी शिष्टमंडळा सह घेतली भेट

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़, महाराष्ट्र राज्य
मो. नंबर -8983319070

आयुक्तांच्या तातडीने दखल घेऊन दिलेल्या लेखी आदेशाने राज्यातील हजारो उमेदवारांचे महानगर पालिके च्या राज्यस्तरीय रद्द झाले ल्या शिक्षकभर्तीचे लाखो रुपये परीक्षा शुल्क परत मिळ ण्याचा मार्ग मोकळा

आज रोजी हेमंत शिंदे (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी महासंघ ) यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगर पालिका आयुक्त यांची 6 वर्षा पासून रद्द झालेल्या शिक्षक भर्ती मधील हजारो शिक्षक उमेदवारांच्या परीक्षा शुल्क परत मिळण्याबाबत शिष्टमंडळासह भेट घेण्यात आली.
या शिष्टमंडळा मध्ये माननीय राहुल भारती ( शिक्षण एक्टीव्हीस्ट व माहितीचा अधिकार कायदया चे अभ्यासक ) माननीय ऐडव्होकेट अमोलजी घुगे (अध्यक्ष – कलासेवा सामाजिक बहुउद्देशिय सेवा संस्था व सुनिता मासुळ ( शिक्षक भर्ती उमेदवार प्रतिनिधि व माध्यमिक शिक्षिका – व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, नाशिक ) यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने बेरोजगार असलेल्या राज्यांतील हजारों उमेदवारांचे आर्थिक परीक्षा शुल्क 6 वर्षा पासून परत न मिळाल्याच्या अन्यायाची गोष्ट आयुक्तांच्या निदर्सनास आणून दिली.
आयुक्तांनी आस्थेने या बाबतची माहिती जाणून घेतली व विषयाचे गाभीर्य लक्षात घेवुन जागेवरच राज्या तील हजारो उमेदवारांचे आर्थिक परीक्षा शुल्क परत करण्याचे लेखी आदेश जागेव रच शिक्षण विभागाला दिले.
आयुक्तांच्या या निर्णया मुळे राज्यांतील हजारों उमेदवारांचे लाखो रूपयांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.
या बाबत लवकरच आर्थिक परताव्याची प्रतिपु र्तिची कार्यवाही पुर्ण झाल्या नंतर आयुक्तांचे आभार मानन्यात येऊन त्याचा सत्कार शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

Previous articleबँकिंग ग्राहक सेवेला सामाजिक कार्याची जोड निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती
Next articleहातात सगळं आयतं पाहिजे .