Home Breaking News सवना गावच्या पोलीस पाटील पदी माधव अनगुलवार यांची निवड!

सवना गावच्या पोलीस पाटील पदी माधव अनगुलवार यांची निवड!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 20 जानेवारी 2024

नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गावातील प्रतिष्ठित मानले जाणारे पोलिस पाटील या पदासाठी जिल्हाधिकारी यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेऊन निवड केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावातील एकुण चार उमेदवार तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी अतिशय शांत, संयमी, अभ्यासु असलेला माधव नागोराव अनगुलवार यांनी चिकाटीने अभ्यास करून सवना ज. गावाच्या पोलिस पाटील पदी त्यांची निवड झाली आहे. गावातील तरुणांनी माधव यांचा अभ्यास करण्याचा आदर्श घ्यावा. आणी जिद्दीने अभ्यास करून आपले आयुष्य सार्थकी लावावे. माधव अनगुलवार यांच्या निवडीचे स्वागत संरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी बांधवांनी हनुमान मंदिर भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

Previous articleयोगेश काईतवाड यांची पोलीस उपअधिक्षक पदी निवड!
Next articleपोलीस पाटील स्पर्धा परीक्षेतील तोंडी मुलाखतीचे गुण जाहीर करा!