Home Breaking News हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..

हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..

👉🏻 हिमायतनगर तालुक्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पो. नि. बि.डी.भुसनुर सह चौधरी, जाधव यांची बदली..
अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी परिक्षेत्राअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १६ पोलिस निरिक्षक, २४ सहाय्यक पोलिस निरिक्षकांसह ६० पोलीस उपनिरिक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये हिमायतनगर शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी.भुसनूर यांनी हिमायतनगर येथे दोन ते तीन वर्ष कार्यकाळ गाजवल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात ते शहरातील बऱ्याच गुन्हेगाराचे कर्दनकाळ ठरले होते त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची लातूर येथे बदली झाल्यामुळे हिमायतनगर शहरातील नागरिकांना त्यांना जड अंतःकरणातुन निरोप द्यावा लागत असल्याचा भावना व्यक्त केल्या…

याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी सह पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर गाव आनंदी होते पण बि.डी. भुसनुर यांचा कार्यकाळ पाहता नि-डर व्यक्तिमत्त्व,रोख ठोक भूमिका घेणारे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची हिमायतनगर तालुक्यातील ओळख निर्माण झाली होती हिमायतनगर येथे बदली होऊन आल्यानंतर शहराचे ग्रामदैवत  परमेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली होती पण पुढे हळूहळू त्यांनी शहरातील सर्व सामान्य नागरिकांशी मोठा जनसंपर्क वाढून तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यामुळे ते शहरात कर्तव्यदक्ष निस्वार्थी व संवेदनशील पोलीस निरीक्षक म्हणून सर्वांचे परिचित झाले हळूहळू त्यांनी शहरातील चोऱ्या, दरोडे, खून,सह समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे ते अधिकच चर्चेत आले होते अशा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाची प्रशासकीय बदली झाल्यामुळे हिमायतनगर शहरातील सर्व सामान्य नागरिकांमधून खंत व्यक्त होत आहे पण प्रशासन म्हंटल्या नंतर जो अधिकारी येतो तो अधिकारी बदली होऊन जातच असतो पण ” पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ” ही संकल्पना शहरात राबविणारे बी.डी.भूसनुर साहेबान सारखे मोजकेच पोलिस अधिकारी पाहायला मिळतात त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांना हिमायतनगर शहरातील आदिवासी भागातील वाडी तांड्यातील नागरिकांकडून जड अंतकरणाने निरोप देत त्यांच्या पुढील कारकीर्दीमध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन त्यांना हिमायतनगर तालुक्यातील नागरिक निरोप देत आहेत

Previous articleक्रिकेट सामन्याच्या वादातुन शुभम ओगोणे पोलिसाचा चाळीसगावात सराईत गुन्हेगारांकडून खून
Next articleयोगेश काईतवाड यांची पोलीस उपअधिक्षक पदी निवड!