हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर 8983319070
पोलिस अधिकाऱ्याकडे तातडीने गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची सकल धनगर समाजाची मागणी
क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून सुट्टीवर चाळीसगाव येथे आलेल्या मुंबई पोलिसाचा धारदार शस्राने खून करण्यात आला. चाळीसगावातील बामोशी बाबा दग्र्या जवळ सायंकाळी ही घटना घडली. शुभम अनिल ओगणे (27) असे मृत पोलिसाचे नाव आहे. शुभमला सराईत गुन्हेगारांनी गळ्यावर धारदार शस्रांनी वार करुन त्याला जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी नेत असताना रास्त्यातच त्याचा मृत्यू झाला. शुभम यांचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. त्याला एक मुलगा असून तो घाट रोड वरील धनगर वस्तीत वास्तव्यास होता, व सुट्टीवर काही दिवसासाठी चाळीसगावात आला होता. शहरात सुरु असलेल्या मॅचमध्ये तो खेळला होता. तसेच रविवारी खरजई नाका परिसरातील क्रिकेट मॅचमध्ये त्याचा संघ जिंकून आलेला होता. क्रिकेट च्या वादातून ही घटना घड ली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सकल धनगर समाजा कडून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.