Home Breaking News करंजी येथील अल्पभूधारक शेतकरी संजय बळवंतराव चाभरकर यांना डाॅ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ...

करंजी येथील अल्पभूधारक शेतकरी संजय बळवंतराव चाभरकर यांना डाॅ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार….

कृषि निष्ठ शेतकरी म्हणुन मिळालेला पुरस्कार माझा एकट्याचा नसुन मला अहोरात्र साथ देणारी माझी पत्नी व सर्व सहकारी मित्रांचा आहे…. संजय बळवंतराव चाभरकर ( शेतकरी )

अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर / प्रतिनिधी

जि. प. उपकर योजने अंतर्गत दि. 10/1/2024 रोजी माळेगाव येथील यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या शेतकरी उपकर योजनेत हिमायतनगर तालुक्यातील करंजी या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी श्री संजय बळवंतराव चाभरकर यांनी आपल्या आपार कष्टातून अवघ्या सात एकर जमिनीतून शासनाच्या विविध योजना राबवत अनेक पिकांवर यशस्वी शेती करुन आज पर्यंत शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आसुन पुन्हा एकदा कृषिनिष्ठ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या सर्व परिश्रमात त्यांच्या आर्धांगीनि सौ. सुरेखाताई संजय चाभरकर यांचा मोलाचा वाटा आहे जेवणात व्हायच आसेल तर जोडीदार सोबतीला मजबुत असावा लागतो हे एक आदर्श या दांपत्यांनी दाखवुन दिला आहे फळबाग, शेततळे , रोपवाटिका, सिड प्लॉट, टोमॅटो, मोसंबी, पेरू, हळद, टरबुज, अश्या अनेक पिकातून भरपुर उत्पन्न घेत सदन शेतकरी म्हणुन तालुक्यासह जिल्ह्लात बहुमान मिळवला असल्याने त्यांच्या या कामगिरीतुनतालुक्यात सर्वत्र त्यांचा शुभेच्छा देउन सत्कार होत आहे. युवा शेतकरी वर्गाला खुप काही शिकण्यासारखे आहे या वितरणाच्या वेळी उपस्थित….श्री.संदिप माळवदे सर (अति मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड), श्री. विजय बेतीवार (मा.कृषी विकास अधिकारी जि. प. नांदेड ) श्री. सुमेध मांजरेकर (मे.गट विकास अधिकारी हिमायतनगर), श्री. जी .डी . भदेवाड (कृषी अधिकारी पं. स. हिमायतनगर श्री. उत्तम देशमुख (विस्तार अधिकारी पं. स. हिमायतनगर ….

Previous article@निधन वार्ता@
Next articleहदगाव -हिमायतनगर मतदार संघात मोठा राजकिय भुकंप होणार का ?