शेतकर्यांच्या कागद पत्रासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी .हिमायतनगर तसेच बोरगडी सज्याचे तलाठी शाहुराव पुणेकर यांनी शहरातील एका मयत शेतकऱ्याचा चुकीचा फेरफार केल्यामुळे त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आसता येथील कर्तव्यदक्ष तलाठी यांनी अधिकारी यांना हाताशी धरुन तात्काळ भोकर तालुक्यात बदली करुन घेतली त्यानंतर मागील एक महिण्यापासुन हिमायतनगर सह बोरगडी सज्जाचे तलाठी पद रिक्त झाल्यामुळे या पदावर आज पर्यंत कुणीही रुजु न झाल्याने शेतकरी यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अनुदानाची रक्कम , ई केवायसी, निराधार, श्रावणबाळ योजना, सातबारा, अश्या अनेक प्रश्नासाठी शेतकर्यांनां तलाठी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. या कडे तहसिलदार गायकवाड साहेब व हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार माधवराव पाटिल जवळगावकर साहेबांनी विशेष लक्ष देण्याची आग्रही मागणी शेतकर्यातुन होत आहे.