Home Breaking News उरळच्या सुनील वानखडेची वर्ल्ड ऑबिलिटी स्पोर्ट्स गेम्ससाठी थायलंड येथे निवड

उरळच्या सुनील वानखडेची वर्ल्ड ऑबिलिटी स्पोर्ट्स गेम्ससाठी थायलंड येथे निवड

उरळच्या सुनील वानखडेची वर्ल्ड ऑबिलिटी स्पोर्ट्स गेम्ससाठी थायलंड येथे निवड
अकोला – 4 डिसेंबर ते 9 डिसेंम्बर  दरम्यान थायलंड येथील Nachon Ratchasima  येथे होणाऱ्या वर्ल्ड ऑबिलिटी स्पोर्टस्‌ गेम्ससाठी  अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, शेळद ता बाळापूर येथे कार्यरत दिव्यांग सहाय्यक शिक्षक, आंतराष्ट्रीय खेळाडू,  गिर्यारोहक तथा दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी कार्य करणारे मार्गदर्शक सुनिल भाऊराव वानखडे यांची व्हीलचेअर फेन्सींग (तलवारबाजी) या खेळासाठी थायलंड येथे निवड करण्यात आली. आतापर्यंत सुनील वानखडे यांनी अनेक राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई महाराष्ट्रासाठी केली आहे. यापूर्वी त्यांनी नेदरलँड व थायलंड येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्रातील सुनील वानखडे सोबत विनय साबळे व अमन थलारी यांनी सुद्धा निवड व्हीलचेअर फेंसिन (तलवारबाजी) साठी झाली आहे.
थायलंड येथे होत असलेल्या वर्ल्ड अबिलिटीस्पोर्ट गेम्स साठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून  निवासी शाळा शेळद, दिव्यांग कर्मचारी/ बेरोजगार संघटना,अकोला, बाळापूर तालुका शारिरिक शिक्षक संघटना, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन अकोला व पॅरालिंपिक असोसिएशन अकोला यांनी त्यांचे अभिनंदन केले वपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
————————————
Previous articleखासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हदगाव तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन….
Next articleहिमायतनगर सह बोरगडी सज्जाला तलाठी मिळेना…..