Home Breaking News खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हदगाव तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन….

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते हदगाव तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन….

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी

हदगाव तालुक्यात आज खासदार हेमंत पाटील व लोकनेते बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले आहे. त्यामध्ये सावरगाव, ठाकरवाडी, रावणगाव तीन किलोमीटर अर्थसंकल्पीय आदिवासी उपाययोजना या अंतर्गत दहा कोटी मंजूर करण्यात आले होते. यात कोंढुर ते माळेगाव पुलाचे बांधकाम 4.50 कोटी, अर्थसंकल्प आदिवासी उपाययोजना 1.50 कोटी कोंढुर ते माळेगाव जिल्हा वार्षिक योजना एक कोटी या पद्धतीने आज हदगाव तालुक्यात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते कोंडुर – माळेगाव पुलाच्या ३ कोटी ४४ लाख रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन

हदगाव –

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव आणि भोकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणार्‍या कोंडुर ते माळेगाव दरम्यान पुलाच्या बांधकामाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन आज करण्यात आले.

यावेळी माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, २०२३ च्या अर्थसंकल्पीय कामकाजात आदिवासी उपयोजनेमध्ये कोंडुर ते माळेगाव पुलाच्या विकास कामाचा समावेश करण्यात आला असून, यासाठी ३ कोटी ४४ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील वाडी, वस्ती तांडे आणि आदिवासी भागातील जनतेला देखील दर्जेदार आणि मजबूत रस्ते, मिळावेत या उद्देशाने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. अशी खासदार हेमंत पाटील यांनी उद्घाटना प्रसंगी माहिती दिली.

सामान्य जनतेच्या हिताची विकास कामे करताना एक वेगळी ऊर्जा मिळतो अशी खासदार हेमंत पाटील यांनी प्रमाणीक पणे कबुली दिली व पूर्णत्वास गेलेल्या कामांचे भूमिपुजन करताना मनस्वी आनंद होतो. असे ते म्हणाले.

या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, सहसंपर्क प्रमुख केशवराव हरण, तालुका प्रमुख विवेक देशमुख, जेष्ठ शिवसैनिक माजी जि. प.सदस्य संभाराव लांडगे मामा, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, भाजपचे निळू पाटील, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील शेलोडेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतल भांगे, डॉ. दीपक नाईक, सुदर्शन पाटील, साहेबराव पा.नेवरीकर, बालाजी राठोड, माजी सभापती तुकाराम चव्हाण, के. के. वानोळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त कोंडुर-माळेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते रफिक भाई यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान….
Next articleउरळच्या सुनील वानखडेची वर्ल्ड ऑबिलिटी स्पोर्ट्स गेम्ससाठी थायलंड येथे निवड