Home Breaking News महाराजा यशवंतराव होळ कर यांचा राज्याभिषेक दिन वाफगाव किल्यात मोठ्या उत्साहात साजरा

महाराजा यशवंतराव होळ कर यांचा राज्याभिषेक दिन वाफगाव किल्यात मोठ्या उत्साहात साजरा

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

आज दि. 06 जानेवारी रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन व गड संवर्धन भूमिपूजन सोहळा गजी नृत्य, मर्दानी खेळ, ढोल वादन व भंडार्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला.
या वर्षी होळकरराज घराण्यातील वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे , श्रीमंत शिवेद्रसिंहराजे, श्रीमंत राघवेंद्रसिंहराजे श्रीमंत अभयसिंहराजे होळकर व सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदारांच्या लोक प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर व होळकर घराण्यावर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी, अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य व देशभरातून उपस्थित होते. भूमीपूजना साठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले,खासदार अमोलजी कोल्हे, सुनीलजी देवधर, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री अण्णासाहेसाहेब डांगे
लष्कराचे काही अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) यांचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज 250 वर्षां नंतर संवर्धित होत आहे हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे.
यशवंतराव महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सर्व गट तट बाजूला ठेऊन महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहून दाखवलेल्या एकी बद्दल खूप खूप आभार…!

Previous articleआचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व दर्पण दिना निमित्त सर्व पत्रकार बांधवाचा हिमायतनगर पोलिस ठाण्यामध्ये सन्मान …
Next articleसामाजिक कार्यकर्ते रफिक भाई यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान….