पत्रकार बांधवांनी सत्याची बाजु आपल्या लेखनातून ठाम पणे मांडावी…. बी. डी. भुसनुर ( पो. निरिक्षक)
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीदर्पण या वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारिता क्षेत्राची मुहुर्तमेढ रोवली. हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र मोठया उत्साहात साजरा केला जातो .
त्यानिमित्ताने हिमायतनगर पोलिस ठाण्यामध्ये बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनर यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करुन पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पत्रकार बांधवांनी चांगल्या कार्याला समाजापुढे मांडुन समाजाला दिशा देण्याच्या कामामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यासाठी दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे. आणि चांगल्या कार्याच्या बाजुने ठामपणे उभं टाकून अन्यायाला वाचा फोडण्याच काम पत्रकारांनी कराव अणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारीतेचा आदर्श जोपासावा असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांनी केले यावे उपस्थित. .. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ पाटिल, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, कानबा पोपुलवार, अनिल मादसवार, प्रकाश जैन, पांडुरंग घाडगे, सोपान बोंपीलवार, संजय मुनेश्वर, मारोती वाडेकर, असद मौलाना, दिलीप शिंदे, चांदगाव वानखेडे, नागोराव शिंदे, नागेश शिंदे, शिध्दोधन हनवते, दाऊ गाडगेवाड, बाबाराव जरगेवाड ,दत्ता पोपुलवार, विष्णु जाधव, सुभाष दारवंडे, अभिषेक बकेवाड, अनिल भौरे, मनोज पाटिल, विजय वाठोरे , वसंत राठोड, गंगाधर गायकवाड, शेख खयुम, धोंडोपंत बनसोडे, अनिल नाईक, प्रभु कदम, लिंगी कदम, अदिसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.