Home Breaking News हिमायतनगर शहराजवळील नव्याने बांधलेल्या पुलास पडले भगदाड!

हिमायतनगर शहराजवळील नव्याने बांधलेल्या पुलास पडले भगदाड!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकरजिल्हा संपादक नांदेड दिनांक -06 जानेवारी 2024

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर हिमायतनगर शहराला लागून एका नाल्यावर नव्यानेच पुल एकसाईडचे बांधकाम नुकतेच झाले आहे. आज सकाळी माॅर्नीग वाॅकला जात असतांना भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते महेश अबिलगे यांनी जवळुन पुलाच्या साईड भिंतीची पाहणी केली असता त्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले दिसले. यावरून पुलाच्या बांधकामाचा दर्जा समजतो आहे. आधिच दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर आता काम सुरू झाले आहे. आणी तेही निकृष्ट दर्जाचे आहे. हिमायतनगर शहरात प्रवेश करीत असतांना किंवा तहसील कार्यालय कडे किती धुळ खावी लागली आहे. हे न सांगलेलेच बरे. या पुलाच्या साईड पट्टीचे भिंतीचे बांधकाम पुन्हा नव्याने सुरू करावे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंबिलगे यांनी दिला आहे.

Previous articleनरसी येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे….. ओबीसी नेते अँड. सचिन नाईक
Next articleआमदार जवळगावकर यांनी केला जेष्ठ पत्रकार गोपतवाड यांचा सत्कार!,