हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्रचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला.
नाशिकला
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिक उपकेंद्राचे समनव्यक मा. संजय सानप यांना निवेदन देण्यात आले, नाशिकमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे
ही तमाम नाशिककरांची मनापासून इच्छा होती, परंतु अनेक वर्षांपासून राज्य सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे हे थांबलेले होते, परंतु नाशिककरांच्या रेट्यामुळे काही वर्षांपूर्वी उपकेंद्र नाशिकला व्हावे यासाठी राज्य सरकारने मान्यता देऊन तेथील काम सुरू केले होते परंतु विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांच्या आपआपसातील मतभेदांमुळे नाशिक उपकेंद्राच्या बाबतीत अन्याय होत असून ह्या उपकेंद्राचे काम बंद पडले आहे आणि हे मनसे विद्यार्थी सेना कदापि सहन करणार नाही,
नाशिकच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी वारंवार पुणे येथील विद्यापीठात छोट्याशा कामासाठी पण चक्रा माराव्या लागतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक, शारीरिक आणि शैक्षणिक नुकसान होते,
शिवाय एकाच चक्कर मध्ये काम होईलच याची पण शाश्वती नसते, त्यामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुणे विद्यापीठ हे लांब पडत असून पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकला झाले तर सर्वांच्या सोयीचे होणार आहे त्यामुळे मनसे विद्यार्थी सेनेचे मनापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मागणी आहे की तुमचे मतभेद सरकारी काम सहा महिने थांब हे धोरण बाजूला ठेवून नाशिक उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करून हे उपकेंद्र निदान यावर्षी तरी सुरू झाले पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उपकेंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि याची जबाबदारी नाशिक पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राची असेल याची दक्षता घ्यावी, ही नम्र विनंती. असे मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले यावेळी मनसेची मागणी विद्यापीठाला कळवण्यात येइल आणि लवकरात लवकर काम सुरू केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी,बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे,कौशल पाटील, उपजिल्हा अध्यक्ष नितीन धानापुणे, शहर अध्यक्ष ललित वाघ,शहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष मेघराज नवले, अविनाश जाधव,गणेश शेजुळ,दीपक बोराडे,विधीचे महेंद्र डहाळे आदी उपस्थित होते.