Home Breaking News हिमायतनगर महावितरण कंपनीच्या अभियंत्याची कार्यालयाला दांडी…..

हिमायतनगर महावितरण कंपनीच्या अभियंत्याची कार्यालयाला दांडी…..

महावितरण उप अभियंता व शाखा अभियंता यांची महावितरण कार्यालयात गैरहजेरीत शेतकरी वर्गातून संताप….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी कार्यालयात उप अभियंता व शाखा अभियंता शहरी हे सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अभियंत्यांच्या गैरहजरीने विद्युत ग्राहकांच्या भावना आता संतप्त होवून मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात विद्युत महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित आहे. येथील तत्कालीन उप अभियंता नागेश लोणे यांची बदली झाल्यानंतर शहरी विभागाचे अभियंता श्री पवन भडंगे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांनी पदभार घेताच मनमानीचा जनु कळसच गाठला आहे. सतत गैरहजर राहत असल्याने आपल्या व्यथा कुणाकडे मांडाव्यात हे विधुत ग्राहकांना समजत नाही. अश्या असंख्य स्वरूपाच्या तक्रारी आहेत. परंतू त्या तोंडी असल्यामुळे की, काय? वरिष्ठ याकडे लक्ष द्यायला तयारच नाहीत. सध्या तर रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे महत्वपूर्ण दिवस आहेत. अनेकांना विजेचे कनेक्शन आहेत, त्यांना वीजपुरवठा बरोबर मिळत नाही तर अनेकांना नवीन विज जोडणी घ्यायची आहेत. परंतू पवन भडंगे हे कार्यालयात भेटतच नाहीत. भडंगे यांचा कार्यकाळ या आगोदर ही एकवेळेस वादग्रस्तच ठरला आहे. रेल्वेस्टेशनवर विज चोरीची घटना झाली. सबंध जिल्ह्यात हा वादग्रस्त विषय गाजला. परंतू मॅनेजमेंट मध्ये भडंगे ना पदवी असल्यामुळे की, काय?

त्यांच्यावरील कारवाई अद्यापपर्यंत गुलदस्त्यात च गुंडाळून आहे. सध्याला शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात ही विज कमी अधिक दाबाची विज येत असल्याने घरगूती उपकरणं चालत नाहीत, जळून जात असल्याने यांना वारंवार फोन करुन सुध्दा या कडे विधुत विभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे.

विज बिल वेळेवर भरूनही विज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने ग्राहकांच्या भावना तिव्र स्वरूपाच्या झाल्या आहेत. आता कार्यकारी अभियंता भोकर व अधिक्षक अभियंता नांदेड यांनी हिमायतनगर कडे जातीने लक्ष पुरवून येथील विज वितरण कार्यालयाची विस्कटलेली घडी निट करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या तत्कालीन उप अभियंता व शहरी श्री भडंगे यांच्यावर कारवाईचा बडगा उभारावा. अशी मागणी शहरवासीय नागरिकांतून पुढे आली आहे.

Previous articleचतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…
Next articleजेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार जाहीर ….