Home Breaking News चतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…

चतुर्भुज झालेल्या तलाठ्याची हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद घेण्यासाठी धडपड सुरू…

👉🏻15 हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास शहराचा कारभार पुन्हा देऊ नये अशी नागरिकांची मागणी…

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील एका मयत शेतकऱ्याचा चुकीचा फेरफार केल्यामुळे येथील कर्तव्यदक्ष तलाठ्याची बदली करण्यात आली त्यानंतर मागील चार वर्षांपूर्वी एका गरीब शेतकऱ्याकडून शेत जमिनीचा फेरफार करण्यासाठी वृद्ध शेतकऱ्यांकडून 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या तत्कालीन तलाठ्याने हिमायतनगर सज्जाचे तलाठी पद रिक्त झाल्यामुळे या पदावर पुन्हा रुजू होऊन अवैध माया कमवण्यासाठी ते शहरातील व तालुक्यातील विविध राजकीय पदाधिकाऱ्याकडे फोन द्वारे संपर्क करून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा लाचखोर तलाठ्यास जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी मॅडम यांनी येथे रुजू करू नये यासाठी हिमायतनगर शहरातील सुजाण नागरिकासह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कडे मागणी केली आहे…

या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथील वृद्ध शेतकरी सय्यद चातारकर वय ८० यांनी दि. १२ डिसेंबर 2019 रोजी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दिली होती यात हिमायतनगर तलाठी सज्जाचे तलाठी रामचंद्र मच्छिंद्रनाथ पुरी वय ३४ यांच्याकडे त्यांची वंशपरपंरागत शेत जमीनीचा फेरफार करून त्यांच्या मुलांच्या नावे करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता हा फेरफार करून सय्यद सातारकर यांची जमिन त्यांच्या मुलांच्या नावावर सात बारामध्ये लावण्यासाठी तलाठी रामचंद्र पुरी यांनी २० हजार लाचेची मागणी केली होती त्यानंतर लाचेच्या रक्कमे संदर्भात तडजोड होऊन पंधरा हजार घेण्याचे पुरी यांनी मान्य केले. या सर्व घटनाक्रमाची पडताळणी दि. १७ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली यानंतर शनिवारी दि. 21 डिसेंबर 2019 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहूल पखाले, पोलिस कर्मचारी बालाजी तेलगे, गणेश केतकर, नरेंद्र बोडके, गणेश तालकोकुलवार आणि हणमंत बोरकर यांच्या पथकाने दुपारी ३ च्या सुमारास शहरात सापळा रचला. यानंतर सय्यद सातारकर यांच्याकडून लाचेची रक्कम देताच तलाठी रामचंद्र पुरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्यांचा वर कार्यवाही केली होती अशा चतुर्भुज झालेल्या तलाठ्यास पुन्हा हिमायतनगर शहरातील तलाठी पद देऊन इथे अवैध कामे करण्यासाठी प्रशासनाकडून अभय देण्यात येत आहे की काय अशी चर्चा शहरात होत आहे ? व संबंधित चतुर्भुज झालेले तलाठी हे येथील राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून या पदावर पुन्हा नियुक्ती मिळवण्यासाठी ते मागील सहा महिन्यापासून धडपड करत आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब व हदगाव उपविभागीय अधिकारी अरुण संगेवार मॅडम यांनी मागील सर्व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चतुर्भुज झालेल्या तलाठ्यास येथे पुन्हा नियुक्ती देऊ नये अशी मागणी हिमायतनगर शहरातील सुजाण नागरिकासह गोर गरीब शेतकरी वर्गातून होत आहे

जिल्हाधिकारी साहेबांनी गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कर्तव्यदक्ष तलाठ्याची येथे नेमणूक करावी…

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहराचे शेतीचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे व येथील लोक संख्या 25 हजारची वस्ती असल्यामुळे येथे शासकीय कामे खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण चतुर्भुज झालेल्या तलाठ्याला पुन्हा इथे नेमणूक दिल्यास त्या कर्मचाऱ्याचे मनोबल अधिक वाढून तो पैसे कमवण्यासाठी गोरगरीब नागरिकांची पिळवणूक सुरू करून अवैध माया कमवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी हिमायतनगर शहरातील गोरगरीब नागरिकांचे कामे वेळेत व चांगले करण्यासाठी एका कर्तव्यदक्ष तलाठ्याची ह्या ठिकाणी नेमणूक करून जनतेस न्याय द्यावा अशी मागणी होत आहे….

Previous articleजलंब येथील भाजप चे एक निष्टावंत कार्यकरत्या नी घेतला जगाचा निरोप
Next articleहिमायतनगर महावितरण कंपनीच्या अभियंत्याची कार्यालयाला दांडी…..