Home Breaking News *जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषिरत्न” पुरस्कारांचे उद्या नाशिकमध्ये वितरण*

*जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषिरत्न” पुरस्कारांचे उद्या नाशिकमध्ये वितरण*

मा. खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान *नाशिक-*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला लक्ष्मी विजय लॉन्स, छ. संभाजीनगर रोड, नाशिक येथे स.११ वाजता पद्मश्री डॉ विकास महात्मे, स्थायी समितीचे सभापती उध्दव बाबा निमसे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ जयराम पूरकर, इफकोच्या संचालिका साधनाताई जाधव, डॉक्टर किसान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल दिंडे, छ. शिवाजी महाराज लोकविद्यापिठाचे महासंचालक डॉ मंगेश देशमुख, डॉ.संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, अन्न महामंडळाचे सदस्य सिध्देश्वर (बापू) शिंदे, मा. जि. प. सदस्य गोरकभाऊ बोडके, डॉ. सुभाषराव शिंदे, कृषितज्ज्ञ सागर पवार, पांडुरंग चव्हाण आदींच्या शुभहस्ते राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा “कृषिरत्न” पुरस्कार देवून सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी दिली.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये संभाजी निचळ, विकास सावरकर, संजय लाड, दत्तात्रय खेमनर, श्री हरी नर्सरी, पद्माकर मोराडे, पुनम डोखळे, प्रशांत दिंडे, रमेश पाटील, जगन शिंदे, डॉ . तेजराव नरवाडे, बारकू गांगुर्डे, किर्तीकुमार शहा, मोतीराम शिंदे, शांताराम गायकवाड, दिलीप बैरागी, भरत नरोडे, अक्षय कृषी फार्म, कृष्णा जाधव, संजय गांगुर्डे, हरिभाऊ सातपुते, संदीप खैरनार, विनायक जाधव, अमोल रौंदळ, संजय गावंडे, गणेश निंबाळकर, जगदीश वाघ, किरण माळी, अनिरुद्ध महाराज, घनश्याम महाले, मुरलीधर धात्रक, धनराज भोये, संपत सानप, जय मल्हार गौसेवा फाऊंडेशन, शिवाजी माळी यांचा समावेश आहे. मेडल, ट्राफी, पैठणी साडी, सन्मानपत्र,भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र, आमची माती आमची माणसं मासिकाचा “शेतकरी गौरव विशेषांक व दिनदर्शिकेचे” प्रकाशन होणार आहे . प्रसिद्ध गायिका रेखा महाजन व सुखदा महाजन यांची सुमधुर गिते, शाहीर नेटावटे यांचा शेतकरी पोवाडा आणि गौरी ताठकर हिचे लावणी नृत्य असा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे.
शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ लामखडे,गोरक्षनाथ जाधव,सुनिल निकम,भगवान खरे,निवृत्ती न्याहारकर,मयुर गऊल,सविता जाधव,शाम गोसावी,वसंत आहेर,उत्तम रौंदळ, नाना पाटील,बाळासाहेब मते,गणेश पाटील,संदीप काळे, सागर रहाणे ,राजेंद्र धोंडगे,सुयोग जाधव,शांताराम कमानकर,सुनिल गमे,स्नेहल लामखडे आदिंनी केले आहे.

Previous articleमराठवाडा पेरकी पेरकेवाड समाज संघटनेची बैठक संपन्न!
Next articleजलंब येथील भाजप चे एक निष्टावंत कार्यकरत्या नी घेतला जगाचा निरोप