Home Breaking News आई वडिलांची निस्वार्थ सेवा करा वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही…..आ. जवळगावकर साहेब

आई वडिलांची निस्वार्थ सेवा करा वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही…..आ. जवळगावकर साहेब

आई म्हणुन कोणी आईस हाक मारी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मातृ देवो भव आणी पितृदेवो भव हेच श्रेष्ठ ….प्रा.डाॅ .रामकृष्ण बदने

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

कारला ( पि.) येथील रहिवासी प्रा. डाॅ. ज्ञानेश्वर धर्माजी घोडगे यांच्या मातोश्री काल. देवकाबाई धर्माजी घोडगे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त प्रा. घोडगे यांनी गुनवंतांचा सत्कार तथा शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम 25/12/2023 आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लोकप्रिय आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते लाभलेले प्रा. डाॅ. रामकृष्ण बदने यांनी आई या विषयातून खरच आईची माया हि सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या वक्तृत्वातुन दाखवुन दिले मुलांना घडवणारे देव कोणी आसतील तर ते आई वडील आणी गुरुजी आसुन ज्याची आई गेली त्यांनाच जाणवते आईची किंमत व ज्याचे वडिल गेले त्यांनाच विचारा वडीलांची किंमत म्हणुन आई वडिलांची सेवा करा तुम्हाला कुठे ही कमी पडणार नाही अश्या प्रखर शब्दात भुमीका मांडली या कार्यक्रमासाठी… प्रा. डाॅ. धर्मराज गोखले ( कृषी विद्यापीठ पुणे), प्रा. डाॅ. भास्कर दवणे (स्वा.रा.म.विद्यापिठ नांदेड, परमेश्वर गोपतवाड ता. अध्यक्ष्य मराठी पत्रकार संघ मा. विशाल भाऊ राठोड, मा. गजानन सुर्यवंशी, ता. अध्यक्ष कोंग्रेस, मा. संजय माने शहराध्यक्ष कोंग्रेस,मा.गोविंद गोखले, वंचित बहुजन ता. अध्यक्ष डाॅ. मनोज राऊत, अनिल नाईक पत्रकार, श्री. नारायण काळे ग्रा. विकास अधिकारी श्री. गजानन कदम (सरपंच ), रोशन धनवे, सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, दत्ता चिंतलवाड, रामा मिराशे,गजानन मिराशे, अब्दुल रझाक भाई, संजय सुर्यवंशी ,नागसेन गोखले श्रीराम मुठेवाड संजय गोखले व समस्त गावकरी बांधवांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारला येथील डाॅ. अब्दुल गफार साहेब यांनी केले व कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सत्कार मुर्ती तसेच गावकरी यांचे प्रा. ज्ञानेश्वर घोडगे, कल्पना ज्ञानेश्वर घोडगे ,सदस्या ग्रां. पं. कारला प्रसेनजित घोडगे, (कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, यांनी आभार मानले….

Previous articleविचार धारा
Next articleमराठवाडा पेरकी पेरकेवाड समाज संघटनेची बैठक संपन्न!