जिल्हा संपादक नांदेड
*१) मदत करणाऱ्याला कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका…!!!*
*२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो…!!!*
*३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका…!!!*
*४) “मदत” एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात…!!!*
*५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते…!!!*
*६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते…!!!*
*७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात…!!!*
*८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही…!!!*
*९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…!!!*
*१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात 🏠 किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे…!!!*
*११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो…!!!*
*१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा…!!!*
*१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली…!!!*
*१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, “स्त्रियांना येथे प्रवेश नाही”. कमाल आहे माणसा तुझी…!!!*
*जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत…*
*”एक” आपण जन्मभर ज्या “मी” बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही…!!!*
*”दोन” जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही…!!!*
*”तीन” क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय!..!!!*
*मला कोणाची गरज नाही हा “अहंकार” आणि सर्वांना माझी गरज आहे हा “भ्रम” या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही…!!!*
*आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!*
…..✍️✍️ जिल्हा संपादक नांदेड साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड