Home Breaking News महात्मा ज्योतिबा फुले मा. व उच्च माध्य. विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.

महात्मा ज्योतिबा फुले मा. व उच्च माध्य. विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 23 डिसेंबर 2023

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण व विस्तार संशोधन संचालनालया अंतर्गत र्विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना विकास व्हावा यासाठी किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक गोकुंदा ता. किनवट येथील सहल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे नुकतीच शैक्षणिक सहल संपन्न झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे विविध विभागांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठतील कृषि काॅलेज, सायन्स लॅब, फुड टेक्नॉलॉजी काॅलेज, सायन्स कॉलेज लॅब आदी विद्यापीठातील विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी प्रा.सदानंद ढगे, प्रा. तुषार नरवाडे प्रा. सुबोध सर्पे प्रा . पाटील मॅडम, प्रा . जेसिका मॅडम, प्रा. वाठोरे मॅडम दोन काॅलेजचे एकुण 100 विद्यार्थीनी या सहली मध्ये सहभाग घेतला होता. असे प्रा. सदानंद ढगेसर यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

Previous articleखासदार हेमंत पाटील यांचा युवकांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम : बाबुराव कदम कोहळीकर
Next articleवंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या हस्ते बाळापुर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांचे व व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न