Home Breaking News भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळाच्या वतीने आयुष्यमान कार्ड वाटपाची जन आरोग्य...

भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळाच्या वतीने आयुष्यमान कार्ड वाटपाची जन आरोग्य मोहीम चालू

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत नागरिकांना रजिस्टर आयुष्यमान कार्ड वाटपाचा कार्यक्रम काझी गढी जुने नाशिक येथे दिनांक 4. 12.2023 रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला .
जुने नाशिक मंडळातील जाणते कार्यकर्ते श्रीयुत हेमंत शुक्ल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नाशिक शहर अध्यक्ष श्री प्रशांत जी जाधव ,शहर सरचिटणीस श्री नाना शिलेदार, युवा उदयोन्मुख नेतृत्व श्रीयुत अजिंक्य फरांदे व भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते लाभार्थींना 800 आयुष्यमान कार्ड वाटप केले.
याप्रसंगी बोलताना शहर सरचिटणीस श्री नाना शिलेदार यांनी या कार्डाचे महत्त्व आणि उपाय सांगून सदर नागरिक सेवा सहकार्य जुने नाशिक भागात कायमस्वरूपी सुरू ठेवत असल्याचे नमूद करून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन केलं
याप्रसंगी जुने नाशिक मंडळातील अनुभवी कार्यकर्ते रतन काळे , दीपक पाटील अतुल क्षीरसागर शामकांत बोरदे श्रीयुत तानाजी अष्टेकर सौ शोभा जाधव सौ कविता तेजाळे सौ रुपाली मर्चंडे सौ सुमन विश्वकर्मा इतर अनेक कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहून येत्या काही दिवसात जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून येण्याच्या विश्वास नागरिकांना दिला आणि कार्यक्रमाची सांगता झाली .

Previous articleप्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन संपन्न
Next articleलॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.