Home Breaking News नाशिकच्या सृष्टी देवला राज्य स्थरीय पुरस्कार

नाशिकच्या सृष्टी देवला राज्य स्थरीय पुरस्कार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

प्रोत्साहन फाउंडेशन आणि लाड़शाखीय वाणी समाज, संभाजी नगर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यंक्तींना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात नाशिक च्या सामाजिक, सांस्कृतिक, व अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या “गोदामाई प्रतिष्ठान ” च्या नाशिक कार्याध्यक्ष यांना त्यांच्या कार्यासाठी राज्यस्थरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राणीवसा सई बाई यांच्या ऐतिहासिक पेहरावात सृष्टी यांनी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा राज्य पुरस्कार स्वीकारला.
सृष्टी या गोदामाई प्रतिष्ठाण च्या कार्याध्यक्ष या माध्यमातुन “गोदावरी नदी स्वच्छता अभियाना ” चा जागर करीत आहे. त्याच बरोबर सांस्कृतिक, अभिनय क्षेत्रात देखिल त्यांची दमदार वाटचाल चालू आहे. ऐतिहासिक महिला व्यंक्तीरेखा साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय आणि स्मिता हिरे फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित एकपात्री स्पर्धा मध्ये ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” यां जगप्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या करीताचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
सृष्टी यांना राज्य पुरस्कार मिळाल्या बद्दल “गोदामाई प्रतिष्ठाण ” चे दिपक पाटील, आबासाहेब देव, रतन काळे, गणेश वैश्य, हेमंत शिंदे, सुभाष कुलकर्णी, श्याम जन्ना वर, रेखा जन्नावर,, प्रफुल्ल काळे, गैारी देव, संस्कृती देव यांच्या सह सामाजिक, सांस्कृतिक, अभिनय क्षेत्रातुन सृष्टी वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Previous articleपिंपळगाव टाकळी बंधाऱ्याला गेट तुटल्याने प्रचंड पाणी गळती…..
Next articleप्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन संपन्न