*आईने मोजलेच नाही…*
आयुष्याच्या तव्यावरती
संसाराची पोळी
भाजता भाजता
हाताला किती बसले चटके
*आईने मोजलेच नाही…*नवर्यासह लेकराबाळांचे
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले,
*आईने मोजलेच नाही…*बाळाला किती झोके
दिले,
बाळा साठी किती रात्री
जागले
*आईने मोजलेच नाही…*जरा चुकले की
घरच्यांची,बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली,
*आईने मोजलेच नाही…*याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी
किती जगले,
*आईने मोजलेच नाही…*पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर,
*आईने मोजलेच नाही…*🏵 *सर्व आईंना समर्पित…*
*साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल नांदेड*