Home Breaking News अवकाळी पावसामुळे पिकांना जिवनदान!

अवकाळी पावसामुळे पिकांना जिवनदान!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 27/11/2023

हिमायतनगर तालुक्यात रविवारी रात्री पासुन सोमवारी सकाळी पर्यन्त जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील कापुन, तुर, हळद पिकांना जिवनदान मिळाले आहे. परंतु नुकत्याच रब्बी हंगामातील पेरणी केलेले गहु, हरभरा, ज्वारी या पिकांना फटका बसणार आहे. असे अनुभवी व जाणकार शेतकरी सांगत आहेत. यावर्षी सुरवातीला उशिरा पाऊस पडल्याने खरीपाच्या पेरण्या उशीरा झाल्या. त्यानंतर पावसात खंड तर कधीकधी प्रचंड पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान जाहीर केले आहे. परंतु शेतकऱ्यांना ते आजतागायत मिळाले नाही. पिकविमा कंपनीने पंचविस टक्के अग्रिम रक्कम देण्याचे मान्य केले आहे. परंतु त्यांचाही एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. लवकारत लवकर अतिवृष्टी व पिकविम्याची रक्कम मिळाली पाहिजे. अशी मागणी जोर धरत आहे.
या अवकाळी पाऊस पडल्याने “कभी खुशी कभी गम” अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. कापूस,तुर, हळद या पिकांना जिवनदान मिळाले आहे. परंतु गहु, हरभरा , रब्बी ज्वारी व मका या पिकांचे नुकसान होणार आहे. अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा केली जाते आहे.

Previous articleहिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू
Next articleमनोज जरांगे पाटील यांचा विदर्भ दौरा सोमवारी खामगावात जाहीर सभा