Home Breaking News हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा

हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा

जिल्हा संपादक नांदेड दि.२६/११/२०२३

हिमायतनगर येथील नालंदा बुद्धविहार येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने नालंदा बुद्धविहार येथे ७६ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपा.गोविंद कांबळे यांनी सर्वांना तत्रिशरण पंचशील दिले. भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आयु.प्रताप लोकडे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्या नंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हिमायतनगर येथील ‘यश अकॅडमी’चे संचालक श्री शेख हनीफ सर यांनी आपल्या भाषणात भारत देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेचा अभिमान व अभ्यास असावा ,इतर देशांच्या तुलनेत ते श्रेष्ठ कसे आहे ,त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब यांनी सलग 60 देशातील विविध घटनांचा अभ्यास करून सर्वात मोठ्या लिखित व परिदृढ अश्या घटनेतील 448 कलम 24 भाग आणि 12 परिशिष्टये /भाग यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगीतली. त्याच बरोबर आयु.शिवाजी कदम सर यांनी संविधानाचे महत्व सांगितले तर कार्यक्रमाला उपस्थित असलेले एड. वडगावकर मॅडम यांनी संविधानाच्या दिनाचे महत्व सांगून ‘ बाबा तुमचा समाज सुधारायला लागला ‘ या कवितेचे सादरीकरण केले. मारोती पोचिराम बनसोडे यांनी गीत सादर केले.या कार्यक्रमाला बाबसाहेब मुनेश्वर, कोंडीबा मामाजी हनवते, अशोक हनवते सर, घोडगे साहेब,आयु. भालचंद्र पोपलवर, आयु. रमेश वाघमारे, प्रमोद हनवते, मारोती कदम, संदीप उमरे, सुरेश लोखंडे,उपा. पुष्पलता ताई भरणे, उपा.छायाताई उमरे, गोदावरी बाई लोखंडे, बालक व बालिका इत्यादी उपस्थित होते. आयु. एम. यु. हनवते सर यांच्या आभार प्रदर्शना नंतर सरणतय घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर
Next articleसंविधान दिवसानिमित्त पंचशील बुद्ध विहार शेगाव येथे शितलताई शेगोकार यांचा सत्कार …