Home Breaking News काँग्रेसच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यां सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश :- जिल्हाध्यक्ष सुधाकर...

काँग्रेसच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यां सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश :- जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर

हिमायतनगर शहरातील भाजपामध्ये नवचैतन्य….

हिमायतनगर शहरात भाजपा पक्ष प्रवेश सोहळा व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम थाटात संपन्न….

अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी / भारतीय जनता पक्षाचे काम देश पातळी सह राज्य पातळीवर जोमाने सुरू असून देशातील व राज्यातील जनता भारतीय जनता पक्षाच्या कामकाजावर खुश व समाधानी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी देशातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने या पक्षात सहभाग घेण्याकरीता समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष म्हणून लवकरच नावारूपाला येईल व जन संघाच्या काळापासून ज्यांनी ज्यांनी पक्षाचे काम केले त्यांचे बलिदान न विसरता निष्ठावंत कार्यकर्त्यांना शोधून भगव्या ध्वजाला प्रमाण मानून येणाऱ्या काळात हिमायतनगर तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी दि 23 नोव्हेंबर रोजी आयोजित शहरातील साई मंदिर येथील भाजपा पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात दि 23 नोव्हेंबर रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य काँगेस च्या ग्राम पंचायत सदस्यांचा पक्ष प्रवेश व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेसचे नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी आज दि 23 नोव्हेंबर एकादशीच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्या सोबत हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव ,धानोरा , कार्ला, पारडी सह आदी गावच्या अनेक तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या वेळी भारतीय जनता पक्षात ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष, अध्यात्मिक आघाडी,अभिव्यक्त सेल, बुद्धिजीवी सेल,सह महिला आघाडी ,शहर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले त्या नंतर भाजपाप्रदेश कार्यकारणीचे निमंत्रित सदस्य अशोक नेमानीवार व महिला मोर्चा जिल्हाअध्यक्ष संध्याताई राठोड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले

या वेळी जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके, जिल्हा सरचिटणीस प्रवीण गायकवाड, जिल्हा सरचिटणीस गजानन तूप्तेवार, विश्वक्रमा योजनेचे केंद्रीय सदस्य डॉ.प्रसाद डोंगरगावकर,विजयराव टेळके पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील कामारीकर,भिभिषण पालोदे ओबीसी प्रदेश सचिव,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विकास माहूरकर,सचिन पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण ठाकूर, चिटणीस दुर्गेश मंडोजवार,हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल, आंदेगावचे उपसरपंच प्र. तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष रुपेश नाईक, हदगाव तालुका अध्यक्ष तातेराव पाटील वाकोडे, हिमायतनगर महिला मोर्चा तालुका अध्यक्ष लताबाई रूघे,मनोज पाटील, ज्ञानेश्वर पंदलवाड ,दत्ता शिराणे, विकास कळकेकर, रायपलवार बापु,लक्ष्मण ढानके, ज्ञानेश्वर माने शिवाजी कदम तुकाराम शिंदे माधव सावंत, , हिमायतनगर शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड, मारोती सुर्यवंशी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, मिराषे सर,शहर अध्यक्ष शीतल सेवनकर ,ओमकार सेवनकर,गजानन पिंपळे,तानाजी सोळंके सह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी , व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येन उपस्थित होत्या

आंदेगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ग्रामीण भागात सुद्धा भाजपाला नवचैतन्य…

तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश नाईक यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा भाजपाला नऊ चैतन्य निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे

Previous articleलोकनेते बाबुराजी कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने रखडलेले घरपडीचे 2022 चे अनुदान लाभार्थ्यांना वाटप
Next articleसकल मराठा समाजाची जरांगे पाटिल यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेच्या निमित्ताने खामगांव येथे नियोजन बैठक संपन्न