शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांची उपचाराअभावी होणारी हेळसांड व पिळवणूक थांबवा
अन्यथा शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पशुधन विकास अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा … लक्ष्मण डांगे (भा.युवा ता. मोर्चा अध्यक्ष)
अंगद सुरेश हिमायतनगर /प्रतिनिधी |हिमायतनगर येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास डांगे यांची गोमाता अचानक अस्वस्थ झाल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी यांना उपचारासाठी बोलावून देखील येण्यास चालढकल केल्यामुळे अखेर गोमाता दगावली आहे. यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले असून, पशुधनाच्या उपचाराची सुविधा देण्यास चालढकल करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी. आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांची उपचाराअभावी होणारी हेळसांड थांबवून योग्य उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पशुधन विकास अधिकारी कार्यालयावर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चा काढू असा इशारा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी दिला आहे. ..
हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्लीत राहणारे अल्पभूधारक शेतकरी कैलास डांगे यांच्याकडे ४ गाई आणि २ कालवडी आहेत. आपल्या कडे असलेल्या गोमातेची सेवा दररोज करून शेतीचे काम करणाऱ्या शेतकऱ्याची एक गाय आज दि.२१ रोजी सकाळी ८ वाजता अचानक अस्वस्थ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याने हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी श्री सोनटक्के यांना संपर्क करून गोमातेच्या उपचार करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी लागलीच येतो… अर्धा तासात येतो.. येतच आहे असे करून तब्बल अडीच ते तीन तास उशिरा आले. त्यामुळे सदरील गाईने तडफडून आपले प्रमाण सोडले. हि घटना आज दुपारी ११ वाजता घडली असून, गे दगावल्याची लक्षात येताच घरातील सदस्यप्रमाणे गाईला जोपासणाऱ्या शेजारी कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळले आहे.
सकाळी गोमातेची प्रकृती बिकट झाली असल्याची माहिती युवा शेतकऱ्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांना देऊन देखील अधिकारी यांनी उपचारासाठी उशीर करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे गोमाता दगावली आहे. केवळ पशुधन विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे गोमाता दगावली असून, यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सदरील नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यास दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्याची दिली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पशुधनाच्या उपचारात चालढकल करणाऱ्या हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करावी आणि गोरगरिब शेतकऱ्यांना उपचाराची सुविधा देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी येथून उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची हिमायतनगर येथे नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.
जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांची उपचाराअभावी होणारी हेळसांड थांबेल आणि मुक्या जनावरांना योग्य वेळी योग्य उपचार सुविधा उपलब्ध होईल. अन्यथा शहरासह परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन पशुधन विकास अधिकारी यांच्या कार्यालयावर कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी दैनिक गावकरीशी बोलताना दिला आहे.
याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्याने हदगाव-हिमायतनगर मतदार संघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्याने गोमातेच्या उपचारासाठी टाळाटाळ केल्याची तक्रार केली आहे. एवढेच नाहीतर या अधिकाऱ्याची येथून उचलबांगडी करून शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची गोवंश उपचारासाठी होणारी हेळसांड व पिळवणूक थांबविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.