हिमायतनगर ( वाढोणा) तालुका सर्व भा.ज.प.मय करणार…. गजानन प्रकाशराव तुप्तेवार
अंगद सुरोशे:-हिमायतनगर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीच्या नुकत्याच नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आसता यामध्ये जेष्ठ कार्यकर्ते गजानन तुप्तेवार यांची जिल्हा सरचिटणीस तर गजानन चायल यांची तालुका अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली या दोन्ही कार्यकर्त्यांचा ग्रामीण भागातील मतदार बांधवात चांगला प्रभाव असल्याने हिमायतनगर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या काळात भा.ज.पा. कडुन प्रतिस्पर्धी पक्षांना तगडे आवाहन असणार आसल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते स्व.प्रकाश आण्णा तुप्तेवार यांना मानणारा वर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने वडिलांच्या कर्तुत्वाचा मोठ्या प्रमाणात मतदानाच्या माध्यमातुन भा.ज.प. पक्षासह तुप्तेवार यांना फायदा होणार असल्याचे चित्र आहे व तसेच गजानन चायल यांनी बजरंग दलाच्या माध्यमातुन तालुक्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांना जोडण्याच काम केले आसल्यांने युवा फळीमध्ये त्यांच मोठ्या प्रमाणात वर्चस्व आसल्याने याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार असल्याने येणारी निवडणुक चुरशीची होणार का ? धानोरा, वारंगटाकळी, कारला पी, बोरगडी, सिबदरा,पोटा, खडकी, सह, अनेक गावातील जेष्ठ युवा कार्यकर्त्यांचा भा. ज. पा. जाहिर प्रवेश कारला येथील उध्दव बाळासाहेब गटाला मोठा फटका उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे.. शामराव लुम्दे लक्ष्मण ढाणके,केशवराव रासमवाड,नाथा मोरे, वयजंत यमजलवाड, प्रशांत चप्पलवाड, राजेश यटलेवाड, भगवान यमजलवाड, संतोष गुंफलवाड, मारोती रासमवाड, रामा यमजलवाड, आनंदा ढाणके, पवण ताटेवाड,प्रदिप चप्पलवाड, मारोती चिंतलवाड, दयानंद ढाणके, सुनिल चिंतलवाड, नाना ढाणके, लक्ष्मण आचमवाड, तुकाराम ताटेवाड, सुदर्शन रासमवाड, लक्ष्मण घोनशेटवाड, कृष्णा ढानके, यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला