दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मा.श्री. प्रकाशभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस शिक्षक सेल अकोला च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक* पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी *स्वराज्य भवन* अकोला येथे सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला राज्यातील 43 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री किरण दादा सरनाईक साहेब , अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. धिरज भाऊ लिंगाडे साहेब , मार्गदर्शक प्रकाशभाऊ तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,मा. प्रकाशजी सोनवणे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल ,अमीत बोबडे अध्यक्ष अमरावती विभाग श्री अमर पाटील अध्यक्ष कोकण विभाग मा.साजिद खान पठाण विरोधी पक्षनेता अकोला, श्री अशोक अमानकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अकोला, डॉ.प्रशांत पाटील वानखडे अध्यक्ष अकोला महानगर काँग्रेस कमिटी प्रदीप शेवतकर अध्यक्ष अमरावती शहर , सुधाकर वाहूरवाघ विभागीय उपाध्यक्ष, सौ. पुष्पा गुलवाडे महिला पदाधिकारी कॉंग्रेस कमिटी ,सुभाष भाऊ सातव राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय माळी महासंघ अॅड. प्रकाशजी दाते अध्यक्ष अकोला अखिल भारतीय माळी महासंघ ,फैयाज खान , सरफराज खान , हसन कामन वाले , दिनेश तायडे सर ,गणेशराव काळपांडे , मनोहर उगले ,पंकज वाढवे, इ. प्रमुख अतिथी उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षकांचा परंतू शासनाच्या निकषातून राहीलेल्या शिक्षकांचा सन्मान आम्ही काँग्रेस शिक्षक सेल अकोला मार्फत गेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करतो. असे प्रतिपादन मा. प्रकाशभाऊ तायडे यांनी केले. आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबई ,ठाणे,नासिक,पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर,वर्धा, जळगांव, धुळे,नंदूरबार, यवतमाळ,अमरावती, बुलढाणा,वाशिम, परभणी,नांदेड, अकोला या जिल्ह्यांमधून शिक्षकांची निवड झाली होती. ते सर्वजण फेटे बांधून संपूर्ण तयारी सह काँग्रेस भवनात वेळेवर हजर होते. काँग्रेस भवनात हा उत्साह थाटात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन .सुनिल जाधव जिल्हाध्यक्ष , प्रा.डॉ.नितीन देऊळकर उपाध्यक्ष ,संदिप शेवलकार महासचिव, प्रा.शेख उबेद जागीरदार , अमृत पवार ,सै.नाशित अली , जुबेर जागीरदार,कु. निलीमा उगले ,कु.सुरभी शेवलकार ,कु. स्वरा राऊत इ. नी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन महेंद्र गवई , प्रा.डॉ. नितीन देऊळकर ,कु.निलिमा उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप शेवलकार यांनी केले.