Home Breaking News @ भाकरी @

@ भाकरी @

तुला मिळवता मिळवता
जीव कासावीस व्हायचा
अंगातून पाझरलेला घाम
मातीत मिसळून जायचा.

भूक नावाची अवदसा
पोटात थयाथया नाचायची
माझ्या संयमाची परीक्षा
दररोज ती बघायची.

तुला हस्तगत करण्या
प्रयत्नांची शिकस्त करायचो
ठणकावून पुन्हा सांगतो
वाट ईमानदारीची धरायचो.

आज माझ्या टोपल्यात
आरामात विसावली आहेस
पाहून माझ्या प्रयत्नांना
मनातून सुखावली आहेस.

वचन देतो गे भाकरी
भूतकाळ विसरणार नाही
आजचा रुबाब दाखवून
अजिबात माजणार नाही!

.……✍️ मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

Previous articleशेतकरी बांधवांना व्याळा फिडरला 24 तास लाईट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी
Next articleहिमायतनगर शहरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी पुकारला तीन दिवस बंद….. 👉🏻बंद मुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे हाल..