ऊर्जा विभागचे महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांना
डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अकोला वतीने निवेदन देण्यात आले…..
व्याळा :-. रब्बी हंगामा सुरू झाला परंतु शेतकरी बांधवांना शेती लाईट पुरेशी मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन संकटात सापडला आहे .
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती लाईट २४तास मिळणे, नविन कनेक्शन हे जास्तीत जास्त ४५ दिवसाच्या आता मिळणे ऊर्जा विभाग जी आर नुसार व झिरो पोल योजना हि शेतकऱ्यांना तात्काळ कनेक्शन देणे अशा प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा विभागचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक हे अकोला दौऱ्यावर असताना यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल अंभोरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी दौऱ्यात मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ अकोला पडळकर, वीज निर्मिती पारस मुख्य अभियंता शरद भगत, सौर ऊर्जा विभागचे मुख्य अभियंता तायडे, अकोला सौर ऊर्जा अधिक्षक अभियंता अकोला विजय काळे हे सोबत होते. यावेळी. उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित समस्या तात्काळ मार्गी लावा अशा सूचना दिल्या
याप्रसंगी संदिप राऊत, उत्तमराव म्हैसने, कैलास इंगळे, उज्ज्वल ठाकरे, सुधाकर सिरसाठ, भिमराव वानखडे, दादा मिटकरी, श्रीकांत वानखडे,किरण वानखडे संतोष इंगळे,विजु पोटे,राजु दळवी, नामदेव पळसकर,आदी शेतकरी उपस्थित होते..