Home Breaking News ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगेंना पत्र!

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगेंना पत्र!

आंदोलनाला समर्थन जाहीर करीत केले जीव जपण्याचे आवाहन!

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी केली महत्त्वपूर्ण सूचना!

आंतरवली सराटी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारांगे पाटील यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रात अतिशय महत्वपूर्ण सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्या असून जरांगे पाटील यांना स्वतःच्या जीवाला जपण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पत्र घेऊन आज अंतरवली सराटी मध्ये दाखल झाल्या आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी हे पत्र सुपूर्द केले.

या पत्रात मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी निवडून आलेल्या आमदार – खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टिकेचा आसूड ओढतांनाच जरंगे पाटील यांना हे आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या पत्रा नंतर आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleमनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण
Next articleमनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर तालुक्यातील कारला फाटा व वडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन