Home Breaking News चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष…राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा…

चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष…राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा…

अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी 

– तालुक्यातील मौजे आंदेगावात चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष… म्हणत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना आज दि 25 ऑक्टोंबर रोजी एक कार्यक्रम घेऊन गाव बंदी केलेली आहे. कोणतेही राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम मराठा आरक्षणवर जोपर्यंत मार्ग निघत नाही तो पर्यंत होऊ देणार नाही, जर घेतले तर ते उधळून लावण्यात येतील असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे

महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात जराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने हिमायतनगर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील ग्रामस्थांनी आज चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष अशा आशयाचे बॅनर लाऊन जो पर्यंत आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी घातली असून, तशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे यावेळी माजी सैनिक चिमणाजी थोटे, सुर्यभान थोटे, सौ. कांताबाई वाढवे(सरपंच), सतिश भुसावळे(प्र. उपसरपंच), धम्मपाल वाढवे, साईनाथ शिंदे, ऊत्तम राऊत ( मा.सरपंच), संतोष मिराशे, दत्तात्रय गटकपवाड (मा. सरपंच), सौ. रेखा मिराशे (ग्रा.प.सदश्य), शे. बसिर(ग्रा.प. सदस्य), डॉ सुर्यवंशी, सौ. कांताबाई थोटे (मा.ग्रा.पं. सदस्य), साईनाथ पाळजवाड, लक्ष्मण बकेवाड, शंकर थोटे, सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. लक्ष्मीबाई थोटे, फिरोज, बालाजी नरवाडे, रवि मिराशे, राजु येलकेवाड(ग्रा.प. सदस्य), अवधुत भुसावळे, शीलवान दवने, दयानंद हापसे, बबन पत्रे, बाळु मस्के, साईनाथ बचेवाड, सह आंदेगाव येथील समस्त गावकरी उपस्थित होते.

Previous articleकवयित्री शितल शेगोकार यांना पुणे येथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित 
Next articleहिमायतनगर येथे तहसीलदार डी.एन रुजु.