Home Breaking News आरक्षणाचा हक्क मिळावल्या खेरीज धनगर समाज स्वस्थ बसणार नाही –

आरक्षणाचा हक्क मिळावल्या खेरीज धनगर समाज स्वस्थ बसणार नाही –

आमदार गोपीचंद पडळकर यांचा धनगर जागर यात्रा नाशिक जिल्हयांतील जळगांव निबायती मधील जाहीर सभे मधून एल्गार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

धनगर समाज एसटी आरक्षणासाठी न्यायालयीन पातळीवर लढाई लढत आहे.पण रस्त्यावर उतरूँन धनगर समाजाची ताकद दाखवून आरक्षणाचा लढा जिंकल्या शिवाय धनगर समाज शांत बसणार नाही.
धनगर समाज जागा झाल्याने प्रस्तापितांची झोप उड़ाल्याची टिका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी एल्गार पुकारला. या सभेत त्यांनी धनगर आरक्षण लढयाची रणनीती स्पष्ट केली. आरक्षणा साठी धनगर समाजाला जात व पक्ष विसरुन एकत्र यावे लागेल.
धनगर आरक्षण अंमल बजावणी तत्काळ
करावी. मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र उपलब्ध करुन दयावे. धनगढ ऐवजी धनगर करुन सरकारने लांबणीवर टाकलेले आरक्षण तत्काळ द्यावे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातील धनगरांना एसटी आरक्षण लागू करावे. धनगर आरक्षणाची केस उच्च न्यायालयात जलदगतीने चालवून निकाल द्यावा या मागण्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे मांडल्या.
सभास्थळी पडळकरांचे हेलीकॉप्टरने आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी व ढ़ोल – ताशांच्या गजरात त्यांची सभास्थळा पर्यंत मिरवणुक काढण्यात आली. आयोजन समितीच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, कासूबाई पाटील यांच्या हस्ते पडळकरांना धनगरी फेटा, घोंगडी, काठी व कु-हाड भेट देत सत्कार करण्यात आला. महाकाल प्रतिष्ठानचे मोहित कडनोर यांनी धनगर समाज बांधवांनसाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचा त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या जाहीर सभेच्या व्यासपीठावर शिवदास बिडग र, विजय हाके, देवीदास चैाध री, मच्छिद्र बिडगर, साईंनाथ गिड़गे, खंडेराव पाटील, भाऊ लाल तांबडे, बापूसाहेब शिंदे, शिवाजी दादा ढेपले आदी नेत्यां सह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article“जिवनाच्या प्रवासात”
Next article