Home Breaking News खामगाव शहरामध्ये 3 कोटी 80 लाख रुपयांचे 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार :आ....

खामगाव शहरामध्ये 3 कोटी 80 लाख रुपयांचे 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार :आ. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश.

खामगाव शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे**

खामगाव शहरातील अतिसंवेदनशीलतेचा प्रश्न मिटविण्यासाठी तसेच गुन्ह्यांचा तपास तातडीने लागण्यासाठी शहरातील 32 ठिकाणी 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यामध्ये संवेदनशील भागाला प्राधान्य देण्यात येत आहे. हे काम जवळपास दोन महिन्यांच्या आत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. खामगाव शहराची ओळख ही राज्यभरामध्ये अतिसंवेदनशील अशी आहे. ही ओळख मिटविण्यासाठी प्रशासनाकडून मोठया प्रमाणावर प्रयत्न होत आहे. तरीही या शहरातील काही घटनांमुळे या प्रयत्नांना अपयश येते. सध्या पोलिसांकडून शहरात सतर्कता बाळगण्यात येत असली तरी कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलिसांकडून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर निर्णय झाला नाही, सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असताना हा प्रस्ताव शासनाकडे पडून होता. शेवटी आमदार आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे शहरात 32 ठिकाणी 70 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामाला गती मिळवून दिली. त्यासोबतच हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून त्याबाबत निविदाही प्रकाशित करून घेतली. आता शहरामध्ये 3 कोटी 80 लाख रुपयांचे 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यामुळे संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

शहरातील मुख्य रस्ते, अतिसंवेदनशील भागांमध्ये

सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. शहराच्या विकासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. त्यासोबतच शहरातील घडणाऱ्या अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी आणि तपासात पोलिसांना मदत मिळण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

Previous articleशेगाव येथील मंगलाताई सोळंके दिल्ली येथे इंदिरा गांधी समरसता पुरस्काराने सन्मानित
Next article“जिवनाच्या प्रवासात”