कार्यालयीन प्रतिनिधी
————————————–
“फोडा आणि राज्य करा” हा इथल्या सवर्णांचा महामंत्र आहे…!!
प्रस्थापित राजकीय पक्ष या महामंत्राचा अवलंब करतांना अनेकदा दिसले आहेत. देशातील जनतेचा तो अनुभव आहे…!!
फोडा या नितीचा अवलंब करतांना जातीय आणि धार्मिक दंगली घडवून हिंसाचारी वृत्तीला खतपाणी घातले जाते आणि द्वेषाच्या तव्यावर राजकीय पोळी भाजली जाते हा स्वातंत्र्या नंतरच्या ७५ वर्षाचा आपल्या देशातील प्रदिर्घ अनुभव आहे…!!
जातीय आणि धार्मिक दंगलीत अल्पसंख्याक, दलित आदिवासी आणि महिला यांना नरक यातना सोसाव्या लागतात हे दंगलीच्या मानसशास्त्राने कित्येकदा नमूद केले आहे…!!
निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवून आणायची अघोरी कृती यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकदा घडलेली आहे, बिहार मधील भागलपूरची दंगल, उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगरची दंगल, ९२ सालची मुंबई दंगल, २००२ मधील गुजरात दंगल हे देशाच्या इतिहासातील हिंदू मुस्लिम दंगलीची ठळक उदाहरणे अतिशय अमानवीय आणि मानवतेला काळीमा फासणारी आहेत…!!
यापैकी काही दंगली कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत तर काही दंगली भाजपच्या राजवटीत घडून आलेल्या आहेत आणि पिडितांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी नेमलेल्या चौकशी आयोगाचे अहवाल नाकारुन त्या त्या शासनकर्त्यांनी आम्ही गेंड्यांच्या कातडीचे आहोत,आणि एकाच माळेचे मणी आहोत हेही सिद्ध केले आहे…!!
७५ वर्षाचा अनुभव असे सांगतो आहे की, इथे सत्तेसाठी जातीय आणि धार्मिक दंगली घडवून माणसं मारली जातात,स्त्रीत्व बाटवले जाते, कोवळे जीव कुसकरल्या जातात,मानवतेला काळीमा फासला जातोय.आणि चौकशी आयोग नेमून पिडितांना तोंडदेखली सहानुभूती दाखविली जाते,मात्र दंगली मधील हिंसाचारी वृत्तीला जरब बसेस अशी ठोस कृती कोणत्याही शासनकर्त्याने अवलंबीली नाही हे वास्तव आहे…!!.
२०२४ च्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात धार्मिक दंगल पेटविण्याचा मनसुबा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर होता…!!
दंगल अचानक आणि एका दिवशी घडतं नाही, दंगलीची पार्श्वभूमीवर तयार केली जाते आणि मग जन आक्रोश या सबबीखाली दंगली घडवून आणल्या जातात, महाराष्ट्रातील अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथे दंगली साठीची पार्श्वभूमीवर तयार केली जातं होती, त्यासाठी पोलीस प्रशासनातील काही अधिकारी हाताशी धरून औरंगजेब यांचे स्टेट्स ठेवले म्हणून मुस्लिम तरुणांवर एफआयआर नोंदवले गेले, कोल्हापूरात मुस्लिम तरुणाला रोडवर नाक घासायला लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयोग केला गेला, अशाप्रकारे मुस्लिम समुहाला भयाच्या हवाली करून औरंगजेब यांच्या बद्दलची द्वेष पेरण्याची योजना कार्यान्वित केल्या गेली होती…!!
ज्यांना, ज्यांना धार्मिक दंगली मुळे राजकीय फायदा होतो ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, पुरोगामी,सेक्युलर सगळे राजकीय पुढारी या घटनांकडे केवळ बघ्याची भुमिका घेऊन पहात होते, मानवतेची कणवं दाखवण्याचे कुणालाही सुचले नाही…!!
परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी येणारे संकट जाणले, होणारा अनर्थ ओळखला, जीवीत हानी सामाजिक विद्वेष तथा मानवते वरील हल्ला आणि अपरिमित नुकसान टाळण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर हे १७ जुन २०२३ ला दौलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर जाऊन त्यांच्या कबरीवर पुष्प वाहली आणि दंगली घडवू पाहणाऱ्यांना आपल्या कृतीतून ठणकावून सांगितले की, आम्ही दंगली घडू देणारं नाही…!!
औरंगजेब यांच्या नावाने दंगली पेटवणा-यांना ऐतिहासिक दाखले देऊन जाब विचारत, जयचंद प्रवृत्तीचे कोण कोण आहेत असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आणि मनुवादी छावणीच्या षढयंत्रातील हवा काढून घेतली…!!
त्यामुळे १७ जुन च्या नंतर गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात एकाही शहरात धार्मिक दंगल घडली नाही, दंगली थांबल्या होणारी जीवितहानी टळली. मुस्लिम समुहाला भयाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्यात यश आले…!!
एका बाजूने सत्तेसाठी दंगली घडविणारे हिंसाचारी आहेत तर दुसऱ्या बाजूने त्या दंगलीचे भांडवल करुन सहानुभूतीचे सोंग करुन फक्त मते लाटणारे ढोंगी पुरोगामी,सेक्युलर कोल्हे आहेत….!!
मानवतावादी दृष्टीनकोन अवलंबून कार्य करणारे, करुणा सागर फक्त आंबेडकर आहेत हे पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे…!!
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची कल्याणकारी राज्य संकल्पना मांडली आहे, ती शासनकर्त्यांना ७३ वर्षांत कार्यान्वित करता आली नाही हे वास्तव आहे मात्र सत्तेत नसतांनाही,हातात शासन नसतांनाही, अधिकाराचे पद नसतांनाही पिडितांना हिंसाचारातून वाचविता येते हे प्रत्यक्ष आपल्या कृतीतून घडवून आणणारे अॅड.प्रकाश आंबेडकर करुणेचा सागर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे…!!
अल्पसंख्याक मुस्लिम समुहाने हा घटनाक्रम आणि आंबेडकरांची कृपादृष्टी ओळखून येणाऱ्या काळात वाटचाल करावी असे मनोमन वाटतेय…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने. 9960241375