प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामपंचायत कडे लेखी आंदोलनाचा इशारा
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
वाडेगाव :-स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या अकोला देगाव मार्गावरील पंख्या नजीक इंदिरा नगर मधील ग्रामस्थाना स्मशानभूमीचे बांधकाम न झाल्याने त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून उघड्यावर अंतिम संस्कार केल्या जात असल्याची तक्रार ग्रामपंचायत कडे ९ ऑक्टोबर सोमवार रोजी वाडेगाव येथील सामजिक कार्यकर्ते माजी सैनिक दिलीप ग्यानुजी डोंगरे व प्रीतम देवलाल डोंगरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कडे दिलेल्या निवेदनामध्ये वाडेगाव झोपडपट्टी जय भीम नगर या भागात बौद्ध हिंदू मुस्लिम व इतर समाजाचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात राहत असून यांची लोकसंख्या सुमारे दोन ते तीन हजार लोकसंख्या आहे.या क्षेत्रासाठी स्थानिक ठिकाणी स्मशानभूमी पंधरा वित्त मधून मंजूर करण्यात आली आहे .अकोला देगाव मार्गावरील मंजूर झालेले स्मशानभूमीचे बांधकाम केल्या दोन ते तीन वर्षापूर्वी रखडलेल्या अवस्थेत असून सदर स्मशा भूमीचे बांधकाम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सदरचे काम अति गंभीर बाब लक्षात न घेता मंजूर झालेल्या निधीमधून या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात यावे .हे बांधकाम पूर्ण झाल्यास सामाजिक स्तरावर ग्राम पंचायत समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.या दरम्यान अपिरित घडल्यास यांची संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी ग्रामपंचायत यांची राहील ही नोंद घेण्यात यावी असे दिलेल्या तक्रारी मध्ये दिलीप ग्यानुजी डोंगरे व प्रीतम देवलाल डोंगरे यांनी केली आहे…