Home Breaking News खामगाव आदर्श नगरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकुळ

खामगाव आदर्श नगरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकुळ

ऊमेश मोरखडे खामगाव प्रतिनिधी

बंद असलेल्या तिन घरांतून ३१ हजार रोख व ४ लाखाचे दागिने चोरून नेले.
खामगाव शहराचा विस्तार चोहीकडे जलद गतीने होत आहे. शहरी भागाची वाढती हद्द व पोलिस कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या यामुळे गुन्हेगारी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चोरटे आधुनिक संज्ञानाचा वापर करून एकीकडे सायबर क्राईम करीत आहेत तर दुसरीकडे नवीन व एकांतात असलेल्या वस्तीमधील बंद असलेल्या घरांची पाळत ठेवून, त्या ठिकाणी चोरीला अंजाम देत आहेत. अशीच घटना रात्री १ ते ३ दरम्यान आदर्श कॉलनी मध्ये घडली. या कॉलनीतील बंद असलेल्या घरांना निशाना करून ५ से ६ अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने चोरून नेले,अज्ञात आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते. मात्र दोन्ही घरात एकही सदस्य उपस्थित नसल्याने मोठी घटना टळली. घटनेची माहिती मिळताच एएसपी अशोक कुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संजय पाटील यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कुलूप लावून नातेवाईकांकडे झोपण्यास गेले होते. आज ७ ऑक्टोबर ला घरी आले असता घराचे कुलूप व कडीकोंडा तोडलेले होते नगदी व सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरीला गेला तर बोराडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने ३९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा पुढील तपास पोका विनोद करीत आहेत. सदर प्रकरण शिक्षक संदीप श्रीराम राऊत यांना समजले असता ते आदर्श कॉलनीतील स्वगृही दुपारी परतले. त्यांच्या कुलूपाची त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या घरातील अलमारीतून सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख असा माल चोरीला गेला. घटनेची माहिती ठाणेदार शांतीकुमार पाटील यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी बुलडाणा येथून श्वान पथकाला बोलविण्यात आले. आदर्श कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या भागात स्वानने दिशा दाखवित चोरीच्या दागिन्यांपैकी काही दागिने असलेली देखील पर्स दाखवली.

Previous articleअपंग अगंंनवाडी महीला कर्मचारी यांना वरिष्ठानी मांगितला जबरदस्ती राजीनामा…
Next articleपिकाचे नुकसान झालेले असतांना पिकविमा कंपणीकडे तक्रार करणे गरजेचे आहे….अनिल उमाळे मुख्यसंपादक साप्ताहिक “भूमीराजा”